मॅरेथॉन धावण्याचा पुणेकर आशिष कासोदेकरांचा जागतिक विक्रम | पुढारी

मॅरेथॉन धावण्याचा पुणेकर आशिष कासोदेकरांचा जागतिक विक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू पुणेकर आशिष कासोदेकर यांनी आज अल्ट्रा डायनामो यात सर्वाधिक सलग 60 दिवस (दररोज 42.195 किमी) अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदविला असून, विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अनिल अवचट यांचे निधन

फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून आशिष कासोदेकर यांनी आतापर्यंत 28 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या परिसरात सलग 60 दिवस (दर दिवशी 42.195 किमी अंतर) धावून हा विक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 वाजता त्यांनी आपल्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली. याप्रसंगी भारतीय ऍथलिट शायनी अब्राहीम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, किशोर ठक्कर, उपकुलगुरु एन एस उमराणी, अल्ट्रा डायनामोचे संस्थापक व स्पर्धा संचालक अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांना कमी मोबदला?

यावेळी बोलताना आशिष कासोदेकर म्हणाले की, हा विक्रम पूर्ण करून मला खूप आनंद झाला आहे. या 60 दिवसांमध्ये माझ्यासोबत असणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यामुळे मला रोज धावण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळायची. आपले ध्येय साध्य करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान आव्हानांना कसे आनंदाने पार करायचे हे मी शिकत गेलो आणि हीच ऊर्जा मला आगामी वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Back to top button