राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती लिखाणाची दखल | पुढारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती लिखाणाची दखल

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ गीते यांच्या व्यसनमुक्ती लिखाणाचे कौतुक केले आहे. सोमनाथ गिते हे गेल्या १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने काम करत आहेत. आपल्या लेखनाच्या माध्यमातून तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या लिखाणाची दखल घेत माननीय राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सोमनाथ गिते समाजासाठी चांगले काम करत आहेत.

पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझीटीव्ह

सोमनाथ यांनी वर्तमानपत्रे व इतर काही माध्यमांतून व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव मांडले आहे. सोमनाथ गिते यांच्या याच कामाचे कौतुक भगतसिंग कोश्यारी यांनी एका पत्राद्वारे करताना म्हटले की, आजही समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम व्यसन करणाऱ्या एकट्या व्यक्तीला नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा समाजाला होत आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांत व्यसनमुक्त विद्यार्थी घडण्यासाठी याचा फायदा होईल असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सौ. सुप्रिया सुळे, आमदार सौ. मुक्ता टिळक, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, डॉ. प्रकाश बाबा आमटे, सौ. वर्षा विद्या विलास अशा अनेकांनी गिते यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे.

हेही वाचा:

गडचिराेली : भाजप नेते आनंद गण्यारपवार अपघातात ठार, कृउबा सभापती अतुल गण्यारपवार जखमी

Pratapsingh Rane : पर्येत आता काँग्रेसचे काय?; प्रतापसिंह राणे यांची जाहीर माघार

सरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स कमी केले, राहुल गांधींच्या या आरोपावर ट्विटरनं दिलं उत्तर

Back to top button