पुणे : इंदापूर तालुक्यातील तलाठ्याला बारामतीत लाच घेताना पकडले | पुढारी

पुणे : इंदापूर तालुक्यातील तलाठ्याला बारामतीत लाच घेताना पकडले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव असून ते कुरवली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी भगत याने १८ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. भगत याने बारामतीतील घरी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले होते. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भगत याच्या घराबाहेर सापळा रचत पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Back to top button