देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या दिवशी घट, पण ओमायक्रॉन बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ ! | पुढारी

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या दिवशी घट, पण ओमायक्रॉन बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ !

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या (ता.१७) तुलनेत २० हजार ७१ रुग्णांनी घट झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मृत्यूमध्येही कालच्या तुलनेत घट झाली आहे. आज ३१० मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील पॉझिटिव्हीटीचा रेट १४.४३ टक्के झाला आहे.

देशात काल २ लाख ३८ हजार १८ बाधित आढळून आले, तर ३१० जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे १ लाख ५७ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले. देशात १७ लाख ३६ हजार ६२८ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८ हजार ८९१ वर पोहोचला आहे. कालपासून ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत ८.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ओमायक्रॉनचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत ४४ लाख बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. लसीकरण अभियानाला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. वर्षभरात देशातील ९३ % प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस लावण्यात आला आहे. तर, ६८.८ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.

केंद्राकडून पुरवण्यात आलेल्या १५८ कोटी १२ लाख ७३ हजार ३५ कोरोना डोस पैकी १३ कोटी ७९ लाख ६२ हजार १८१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशात रविवारी दिवसभरात १३ लाख १३ हजार ४४४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ७० कोटी ३७ लाख ६२ हजार २८२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button