pm modi viral video : ऐनवेळी टेलिप्राॅम्टर बंद पडला अन् पीएम मोदींचा उडाला गोंधळ | पुढारी

pm modi viral video : ऐनवेळी टेलिप्राॅम्टर बंद पडला अन् पीएम मोदींचा उडाला गोंधळ

पुढारी ऑनलाईन डेस्क

संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वक्तृत्व शैलीने प्रसिद्ध आहे. त्यांनी सोमवारी वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूर संवादाद्वारे विशेष भाषण दिले. मात्र, या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडताना दिसत आहेत. कारण, भाषणादरम्यान टेलिप्राॅम्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे थोड्या वेळासाठी पंतप्रधान मोदी गोंधळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत असल्यामुळे सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. या व्हिडिओमध्ये ते सांगत होते की, भारतीयांनी कोरोनाविरुद्ध कसा लढा दिला, यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, पुढे बोलत असताना टेलिप्राॅम्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि तो बंद झाला. त्यानंतर पंतप्रधान बोलायचे थांबले.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडाल्यामुळे ते संतप्त हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. ते उजवीकडे पाहू लागले. नंतर ते निराश झाले आणि हात वर करून शेवटी त्यांनी हेडफोन लावत त्यांनी आपल्या भाषणाध्ये झालेल्या गोंधळावर समोरील व्यक्तींना विचारु लागले की, “तुम्हाला ऐकू येतंय का?”

नरेंद्र मोदी यांच्या गोंधळ झालेल्या प्रकारावरून काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना मोजक्याच शब्दात टोमणा मारला आहे. ते म्हणाले, “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.

संपूर्ण जगात आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. पण, यावेळी टेलिप्राॅम्टरमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसला. त्यांना अडखळत अडखळत बोलू लागले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. 

Back to top button