Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प

सुदैवाने जीवितहानी टळली; स्थानिकांच्या मदतीने झाड हटवून रस्ता मोकळा
Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प
Published on
Updated on

कासा : डहाणू–जव्हार राज्यमार्गावरील सारणी खिंडीत गुरुवारी (दि.9) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पंगाऱ्याचे भलेमोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. याचवेळी डहाणूहून मनोरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-०३-ईबी-६५३७ क्रमांकाच्या कारवर झाडाचा काही भाग कोसळला. सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प
kalyan Accident | कल्याण-शिळ महामार्गावर केडीएमटी बसचा अपघात, मेट्रोच्या संरक्षक कठड्याला बस धडकली

घटनेनंतर काही काळ डहाणू–जव्हार राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजय तुंबडा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाच्या फांद्या छाटून रस्त्याच्या कडेला हटवल्या. प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतल्याने काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प
Bhise Khind Roha news : भिसे खिंडीत झाड पडून वाहतूक ठप्प, JCP च्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

पालघर जिल्ह्यात गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका डहाणू तालुक्यालाही बसला आहे. गुरुवारी काही काळ पावसाने उघडीप दिली असली तरी सततच्या पावसामुळे सारणी परिसरातील रस्त्यालगतची अनेक मोठी झाडे धोकादायक स्थितीत आली आहेत. त्यामुळे अशा झाडांची पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने छाटणी करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताचा धोका वाढल्याची नागरिकांची भावना आहे.

Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प
Bhavadbari Ghat Deola Landslide | पहिल्याच पावसात भावडबारीत कोसळली दरड; वाहतूक ठप्प

याशिवाय डहाणू–चारोटी मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. पावसामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे, रस्त्यालगतची धोकादायक झाडे आणि रानशेतजवळील सुसरी नदीवरील जीर्ण पुलाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Palghar Tree falls on car : सारणी खिंडीत धावत्या कारवर पंगाऱ्याचे झाड कोसळले; वाहतूक काही काळ ठप्प
Chandanapuri Ghat Landslide: चंदनापुरी घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news