Bhise Khind Roha news : भिसे खिंडीत झाड पडून वाहतूक ठप्प, JCP च्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

या संपूर्ण भिसे खिंडीत सध्या अनेक झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत उभी आहेत
Bhise Khind Roha news : भिसे खिंडीत  झाड पडून वाहतूक ठप्प, JCP च्या सहाय्याने  रस्ता मोकळा  करण्याचे काम सुरू
Published on
Updated on

नागोठणे: नागोठणे शहर व परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी (५ जुलै) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीत, आमडोशी फाट्याजवळ एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाडासोबतच मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Bhise Khind Roha news : भिसे खिंडीत  झाड पडून वाहतूक ठप्प, JCP च्या सहाय्याने  रस्ता मोकळा  करण्याचे काम सुरू
Ambenali ghat | आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम!

घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) रवींद्र पारखे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी 'जेसीबी'च्या (JCB) साहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचे आणि माती साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. थोड्याच वेळात हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात येईल, अशी माहिती सपोनि रवींद्र पारखे यांनी दिली आहे.

Bhise Khind Roha news : भिसे खिंडीत  झाड पडून वाहतूक ठप्प, JCP च्या सहाय्याने  रस्ता मोकळा  करण्याचे काम सुरू
Belgaum Tree Collapse | नंदगड-बिडी मार्गावर झाड कोसळले; वृद्ध दुचाकीस्वार जखमी, वाहतूक ठप्प

धोकादायक झाडे हटवण्याची वाहनचालकांची मागणी

दरम्यान, या संपूर्ण भिसे खिंडीत सध्या अनेक झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत उभी आहेत. ही झाडे कधीही कोसळण्याची भीती असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित खात्याने ही धोकादायक झाडे तातडीने बाजूला करावीत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news