Bhavadbari Ghat Deola Landslide | पहिल्याच पावसात भावडबारीत कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Bhavadbari Ghat Deola Landslide | सुदैवाने जीवितहानी नाही; संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी
Bhavadbari Ghat Deola Landslide
Bhavadbari Ghat Deola Landslidesatara News
Published on
Updated on

देवळा : पुढारी वृत्तसेवा

विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाटात सोमवारी (दि. २२) सायंकाळी ४.३० च्या सुमारास पहिल्याच पावसात काही प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

Bhavadbari Ghat Deola Landslide
Ambenali Ghat accident: भय इथले संपत नाही, ‌‘आंबेनळी‌’ प्रवासासाठी धोकादायकच!

मात्र, घाट परिसरात सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वरील भावडबारी घाट रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.

घाटातील डोंगरकड्यांचे कटिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, अनेक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. सोमवारी झालेली घटना ही याच धोक्याची पूर्वसूचना असल्याचे प्रवासी व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. घाटातील म्हसोबा देवस्थानच्या दोन्ही बाजूंना घाट कटिंगचे काम अद्याप अपूर्ण असून, देवस्थानाचे योग्य व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याची मागणीही पुढे आली आहे.

सध्या घाटरस्ता सरळ पद्धतीने कापण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा मुरूम व दगडांवर होणारा परिणाम वाढून दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक कुबेर जाधव यांच्यासह अनेक प्रवासी व वाहनचालकांनी घाट परिसरात तातडीने संरक्षक लोखंडी जाळ्या तसेच आवश्यक ठिकाणी मजबूत कठडे उभारण्याची मागणी केली आहे.

कुबेर जाधव म्हणाले की भावडबारी घाटातील डोंगरकपारींन संरक्षण देण्यासाठी तत्काळ लोखंड जाळ्या बसविणे गरजेचे आहे. म्हसोब महाराज देवस्थानाचे सुरक्षित पुनर्वसनही वेळेत व्हावे.

Bhavadbari Ghat Deola Landslide
Karul Ghat Vaibhavwadi Road | करूळ घाट मार्ग सुसाट; मात्र दरडी कोसळण्याचा धोका कायम

अन्यथ पावसाळ्यात दरड कोसळून मोठ जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविला जाईल. स्थानिक नागरिकांनी वाहनचालकांनी प्रशासन व संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागण केली आहे.

सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे बॅरिकेड

सोमवारी सायंकाळी दरड कोसळली होती. परंतु मंगळवारी दुपारी पाऊस झाल्यामुळे पुन्हा काही प्रमाणात दरड कोसळली. दरड कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे बॅरिकेड लावण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news