Chandanapuri Ghat Landslide: चंदनापुरी घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला

पहिल्याच मुसळधार पावसात घटना; रस्त्यावरील दगड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत
Chandanapuri Ghat Landslide
Chandanapuri Ghat LandslidePudhari
Published on
Updated on

संगमनेर: दरवर्षी पावसाळ्यात चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. यंदाही पहिल्याच पावसात काल मंगळवारी (दि. ७) सकाळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. काल सायंकाळपर्यंत ही दरड हटवुन वाहतूक सुरू करण्यात आली.

Chandanapuri Ghat Landslide
Karjat Nagaradhyaksha Election: कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार बिनविरोध; 10 जुलैला अधिकृत घोषणा

गेल्या चार-पाच दिवसापासून तालुक्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यातच अनेक ठिकाणी नाशिक-पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात डोंगर व घाटात प्रवास करताना काळजी घ्यावी लागते. तर दरड कोसळण्याच्या घटनेने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

Chandanapuri Ghat Landslide
Ahilyanagar Hotel License Suspended: अहिल्यानगरात मोठी कारवाई! हॉटेल संगमसह 6 हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

चंदनापुरी घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. प्रशासन उपाययोजना करत नसल्याने वारंवार घटना घडत असून मंगळवारी (दि. ७) दुपारी घाटातच डोंगरावरील दगड रस्त्यावर पडले. ही दरड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने दगड रस्त्यावर पडत्यावेळी वाहने, नागरिक, प्रवासी या ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Chandanapuri Ghat Landslide
Ahilyanagar Heavy Rain: अहिल्यानगरात मुसळधार पावसाचा कहर! घाटघर-रतनवाडीत 321 मिमी पाऊस; भंडारदरा, मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक

त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक रावसाहेब बांबळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले, त्यांनी छोटे दगड बाजुला केले. याची माहिती महामार्ग विभागाला देण्यात आली. त्यांनी महामार्गावर पडलेले दगड हटविले काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास झाला. पावसाळ्यात चंदनापुरी घाटातून जाताना काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग विभागाने केले आहे.

Chandanapuri Ghat Landslide
Mahavitaran Negligence: चिमुरडीच्या मृत्यूनंतर महावितरण कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन; दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन

दरम्यान, चंदनापुरी घाटातील डोंगरावरून काही छोटे-मोठे दगड रस्त्यावर पडले. याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील काही दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे महामार्ग पोलिस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news