नाशिक : भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा करताना आ. देवयानी फरांदे, गिरीश पालवे आदी. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा करताना आ. देवयानी फरांदे, गिरीश पालवे आदी. (छाया: हेमंत घोरपडे)

विधान परिषद निवडणूक विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमदेवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रा. राम शिंदे, श्रीकांत भारतीय व उमा खापरे या पाचही उमेदवारांचा विजय झाल्यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालय येथे जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांवर गुलाबपुष्पांची उधळण करण्यात आली. या आनंदोत्सवाप्रसंगी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, जगन पाटील, अरुण शेंदुर्णीकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, चंद्रशेखर पंचाक्षरी, भास्कर घोडेकर, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संध्या कुलकर्णी, विक्रम नागरे, सतीश सोनवणे, दिनकर पाटील, शाहीन मिर्झा, छाया देवांग, स्वाती भामरे, अ‍ॅड. अजिंक्य साने, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुरेश खेताडे, शरद मोरे, शिवाजी गांगुर्डे, संगीता गायकवाड, अलका जांभेकर, उत्तम उगले, संतोष नेरे, प्रा. कुणाल वाघ, सेामनाथ बोडके, गणेश कांबळे, नीलेश बोरा, निखिल पवार, ललित नहार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news