जळगाव: सांगवी- भालोद रस्त्याजवळ सापडले नवजात अर्भक

आदिवासी विभागाचा घोटाळा : हिंगोलीतून एकास चौकशीसाठी घेतलं ताब्यात
आदिवासी विभागाचा घोटाळा : हिंगोलीतून एकास चौकशीसाठी घेतलं ताब्यात
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: सांगवी ते भालोद रस्त्यावर एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज मंगळवारी (दि. १९) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेतात कामाला जात होते.

यावेळी वाटेत असलेल्या हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यानंतर शेतमजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. या घटनेमुळे यावल परिसरात खळबळ माजली आहे.

मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय-२६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माता- पित्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अनंत अमुची ध्येयासक्ती : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news