नाशिकरोड व्यापारी बॅंकेस विभागीय आयुक्तांची भेट

नाशिकरोड : येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेला सदिच्छा भेट देताना विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेला सदिच्छा भेट देताना विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे. (छाया: उमेश देशमुख)

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा
विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेला सदिच्छा भेट देत बॅंकेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे. त्यानिमित्ताने बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी राधाकृष्ण गमे यांचा सत्कार केला.

सत्कारप्रसंगी उपाध्यक्ष सुधाकर जाधव, जगन आगळे, सुनिल आडके, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, मनोहर करोडे, वसंत आरिंगळे, अशोक चोरडिया, डॉ. प्रशांत भुतडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, रंजना बोराडे, कमल आढाव, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, उप महाव्यवस्थापक संजय वाघ, सहाय्यक महाव्यवस्थापक दिनेश नाथ आदी उपस्थित होते.

सरकारी बॅंकेकडून सर्व सामान्यांना कर्ज पुरवठा होत नव्हता. त्यामुळे सहकारी बॅंकेचा उदय झाला. आजच्या सरकारी व खाजगी बॅंकांच्या वाढत्या स्पर्धामुळे सहकारी बॅंका चालविणे कसरतीचे काम झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही नाशिकरोड व्यापारी बॅंकेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. नाशिक जिल्ह्यात कर्जवसुली चांगली होत असल्याने नामवंत बॅंका येथे विश्वसावर येत आहेत. सभासदांच्या प्रगतीबरोबर बॅंकेची प्रगती होणे आवश्यक आहे. बॅंकेचे संचालक मंडळात विविध पक्षांचे प्रतिनिधी असूनही बॅंकेच्या प्रगतीसाठी ते एकत्र काम करतात. बहुजन समाजातील सभासदांना कर्जपुरवठा करून त्यांची प्रगती बॅंक साधत आहे. त्यांच्याबरोबर संस्थेची प्रगती आवश्यक आहे. संस्था व समाज दोन्ही टिकले पाहिजे, असे आयुक्त राधाकृष्ण गमे  यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news