ICC T20 Ranking : सूर्यकुमारने प्रथमच टी-२० रॅकिंगमध्‍ये मिळवले ८९५ गुण, मोहम्‍मद रिझवान ५४ गुणांनी पिछाडीवर | पुढारी

ICC T20 Ranking : सूर्यकुमारने प्रथमच टी-२० रॅकिंगमध्‍ये मिळवले ८९५ गुण, मोहम्‍मद रिझवान ५४ गुणांनी पिछाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने नुकतेच न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या टी-२० मालिकेत अविस्‍मरणीय शतकी खेळी केली. या खेळीचा त्‍याला फायदा झाला असून ICC T20 Ranking मध्‍ये अग्रस्‍थानी असणार्‍या सूर्यकुमारने आपल्‍या नावावर ८९५ गुण मिळवले आहेत. एवढे गुण मिळवण्‍याची त्‍याची ही पहिलीच वेळ आहे. या गुणांमुळे T20 Rankingमधील अग्रस्‍थानावरील आपली दावेदारीही त्‍याने आणखी मजबूत केली आहे.

ICC T20 Ranking : दमदार शतकी खेळीमुळे गुणांमध्‍ये लक्षणीय वाढ

ICC T20 Ranking मध्‍ये सूर्यकुमार हा अव्‍वल स्‍थानी आहे. नुकत्‍याच ऑस्‍ट्रलियात झालेल्‍यात झालेल्‍या टी-२०
विश्‍वचषक स्‍पर्धेत सूर्यकुमार २३९ धावा केल्‍या. यानंतर त्‍याने न्‍यूझीलंड दौर्‍यात १२४ धावा केल्‍या आणि तो केवळ एकदाच बाद झाला. न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या दुसर्‍या टी-२० सामन्‍यात सूर्यकुमारने नाबाद १११ धावा केल्‍या होत्‍या. त्‍यामुळे या खे‍‍ळीमुळे आजवरच्‍या कारकीर्दीतील सर्वात्‍कृष्‍ट असे ८९५ गुण त्याच्या नावावर नोंदले गेले आहेत. तिसर्‍या टी-२० सामन्‍यात सूर्यकुमार १३ धावांवर बाद झाला होता. यामुळे त्‍याला पाच अंकाचे नुकसान झाले आहे.

सध्‍या T20 Ranking मध्‍ये ८९० गुण मिळवत सूर्यकुमार पहिल्‍या स्‍थानावर आहेत. दुसर्‍या स्‍थानावर असणारा पाकिस्‍तानचा सलामीवीर मोहम्‍मद रिझवान हा सूर्यकुमारच्या तुलनेत ५४ अंक पिछाडीवर आहे. सध्‍या त्‍याच्‍या नावावर ८३६ गुण आहेत. न्‍यूझीलंडचा डेवॉन कॉनवे याने दुसर्‍या टी-२० सामन्‍यात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्‍यामुळे त्‍याने ७८८ गुण कमावत तिसर्‍या स्‍थानवर झेप घेतली आहे. त्‍याच्‍या कामगिरीमुळे पाकिस्‍तान कर्णधार बाबर आझर चौथ्‍या स्‍थानावर घसरला आहे. भारताच्‍या ईशान किशन यालाही उत्‍कृष्‍ट फलंदाजीचा फायदा झाला आहे. तो T20 Ranking मध्‍ये ४४ व्‍या स्‍थानावरुन ३३ व्‍या स्‍थानवर आला आहे.

T20 Ranking मध्‍ये गोलंदाजांच्‍या स्‍थानात कोणाताही बदल झालेला नाही. मात्र भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याने ११ स्‍थानावर गेला आहे. भारताविरुद्धच्‍या दुसर्‍या टी-२० सामन्‍यात हॅटट्रिक घेतल्याने न्यूझीलंडचा टीम साऊदी १४ व्‍या स्‍थानवर आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button