‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ ; नाशिक जिल्ह्यात आजपासून लोककलेद्वारे जागर

नाशिक : कला पथकातील कलाकारांना पत्र देताना जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत. समवेत अर्चना देशमुख व जया कोल्हे.
नाशिक : कला पथकातील कलाकारांना पत्र देताना जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत. समवेत अर्चना देशमुख व जया कोल्हे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादीवरील तीन लोककला पथकांची निवड केल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली. 'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या घोषवाक्यासह जिल्हाभरात व्यापक जनजागृती करण्यात येईल.

जिल्ह्यातील 10 शासनमान्य यादीतील लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकचे चाणक्य कलामंच कला पथक व इगतपुरीमधील नटराज लोककला अकादमी तसेतरंग फाउंडेशनचा यात समावेश आहे. सोमवार (दि. 7)पासून या कला पथकांच्या माध्यमातून 15 तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 11 तारखेपर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल. प्रत्येक कला पथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार असून, त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वेस्थानकांच्या बाहेरचा परिसर आदी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. नारिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

संस्था व तालुके – 

चाणक्य कलामंच कला पथक : पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर

नटराज लोककला अकादमी : मालेगाव, बागलाण, मनमाड, सिन्नर, कळवण

आनंद तरंग फाउंडेशन : नाशिक, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news