लासलगावी पोलिसांचा रुट मार्च

लासलगावी पोलिसांचा रुट मार्च
Published on
Updated on
लासलगाव वार्ताहर : लासलगाव शहरात विविध भागातून पोलिसांनी आज रुट मार्च काढला. रमजान ईद, अक्षय तृतीया आदी सणांच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नागरिकांना यानिमित्ताने सुरक्षिततेची हमी दिली.
लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी रूट मार्च काढला. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता सण आनंदी वातावरणात साजरा करावा, कोणत्याही व्यक्तीकडून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आले. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे यांच्यासह पोलीस कर्मचारी या संचलनलयात सहभागी झाले होते.
हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news