Ashish Shelar : संजय राऊत यांचा बाबरीशी काय संबंध?; आशिष शेलारांचा सवाल

Ashish Shelar : संजय राऊत यांचा बाबरीशी काय संबंध?; आशिष शेलारांचा सवाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत यांचा बाबरीशी काय संबंध? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आरोपास्त्र सोडले. बाबरी मशिदीचे श्रेय लाटण्याच्या नादात शिवसेना आहे. पण तुमच्या जन्माआधीपासून आम्ही बाबरीचे आंदोलन करत आहोत. बाबरी लढ्याची जबाबदारी संघ परिवाराने घेतली. या आंदोलनाची सुरूवात साधुसंतांनी केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झालेला आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली.

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले होते पण ते धुर्त होते. हे आम्हाला नंतर समजले. राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना आता टायमिंग दिसत आहेत. असा टोलादेखील त्यांनी लगावला.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील भाषणावर कारवाई करत असण्याच्या सरकारच्या भुमिकेवर त्यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, चिथावणीची भाषणं बघायची असतील तर सर्वांचीच भाषणे पहा. ओवेसींच्या भाषणावर न्यायालय गप्प का आहे ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news