नाशिकमध्ये कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला फासले काळे

कर्नाटक बॅंक नाशिक,www.pudhari.news
कर्नाटक बॅंक नाशिक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला असून हे लोन आता नाशिकपर्यंत येऊन पोहचले आहे. नाशिकमध्ये यावरुन स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर येथील कर्नाटक बॅंकसमोर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वराज्य संघटनेने आंदोलन करुन निषेध नोंदवला. यावेळी स्वराज्य संघटेच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला काळे फासण्यात आले.

काल, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान नाशिकमध्येही वातावरण चांगलेच तापले आहे. आज सकाळी स्वराज्य संघटनेने कर्नाटक बॅंकेला काळे फासत महाराष्ट्र व कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  कर्नाटकने आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी स्वराज्य संघटनेने दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news