IND vs BAN 2nd ODI : भारताला सातवा झटका, शार्दुल ठाकूर बाद | पुढारी

IND vs BAN 2nd ODI : भारताला सातवा झटका, शार्दुल ठाकूर बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज नॅशनल स्टेडियम, मीरपूर येथे सुरु आहे. २७२ धावांचा पाठलाग करणार्‍या टीम इंडियाने चार गडी गमावत १५० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला आहे.  भारताला श्रेयस अय्यरच्या रूपाने पाचवा धक्का बसला आहे. मेहंदी हसनने त्याला झेलबाद केले.

अक्षर पटेलचे दमदार अर्धशतक

भारताला १०० धावांची गरज असताना श्रेयस अय्यर झेलबाद झाला आहे. मात्र, अक्षर पटेलने अर्धशतक झळकावत भारताच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्याने ५४ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला आहे.

श्रेयसचे अर्धशतक

श्रेयस अय्‍यरने दमदार अधर्धशतक झळकावले. त्‍याने ४ चाैकार आणि १ षटकाराच्‍या मदतीने त्‍याने ६९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. २५ षटकांच्‍या खेळानंतर भारताने चार गडी गमावत ११४ धावा केल्‍या. श्रेयस अय्‍यर ५३ तर अक्षर पटेल २२ धावांवर खेळत आहे.

भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्‍त असल्‍याने सलामीला आलेला विराट कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला. त्‍याला इबादत हसन याने त्रिफळाचीत केले. यानंतर आठ धावांवर खेळत असलेल्‍या शिखर धवनला मुस्‍तफिजूर याने बाद केले. , शाकिबने  वॉशिंग्टन सुंदर ११ धावांवर बाद  केले. यानंतर श्रेयस अय्‍यर आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाचा भारताला चाौथा धक्‍का बसला. मेहदीने १४ धावांवर खेळणार्‍या केएल राहुल याला यष्‍टीचीत केले.

मेहदीचे शतक, भारतासमोर २७२ धावांचे आव्हान

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजच्या दमदार शतकाच्या जोरावर बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २७१ धावा केल्या. मेहदी हसनने ८३ चेंडूत शतक ठोकले. तर महमुदुल्‍लाहने ७७ धावा केल्या. सुरुवातीला बांगलादेशचा डाव गडगडला होता. पण सातव्या विकेटसाठी मेहदी हसन आणि महमुदुल्‍लाह यांनी शतकी भागीदारी करत धावसंख्या २७० पार केली.

भारत आणि बांगलादेश वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज नॅशनल स्टेडियम, मीरपूर येथे सुरु आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्‍या भेदक गाोलंदाजीसमाोर बांगलादेशचा डाव सुरुवातीला गडगडला  होता. बांगलादेशने १९ षटकांमध्‍ये सहा गडी गमावत केवळ ६९ धावा केल्‍या. यानंतर मेहदी मिराज आणि महमुदुल्‍लाह यांची शतकी भागीदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. ३६ व्या षटकांत बांगलादेशने १५० धावांचा टप्पा पार केला. ४७ षटकानंतर बांगलादेशने सात गडी गमावत २३१ धावा केल्‍या होत्या.

 भारतीय गाेलंदाजांचा भेदक मारा

मोहम्मद सिराजने बांगलादेश संघाला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर अनामूल हकला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. सामन्याच्या ९ व्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर मोहम्मद सिराजने लिटन दासला बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्याने २३ चेंडूत ७ धावांची खेळी केली. १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूला उमरान मलिकने नजमुल हुसेन शांतोला बाद केले. त्याने ३५ चेंडूत २१ धावा केल्या. शकीब अल हसन २० चेंडूत ८ धावा करून बाद झाला. त्याला वॉशिंग्टन सुंदर याने १६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूत शिखर धवन करवी झेलबाद केले.

वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन चेंडूंत विकेट घेत भारताला सहावे यश मिळवून दिले. १८ षटकामध्ये ५ व्या चेंडूवर मुशफिकुर रहीमला बादनंतर पुढच्याच चेंडूवर त्याने अफिफ हुसैनला क्लीन बोल्ड केले. बांगलादेशने १९ षटकांपर्यंत ६ गडी गमावत ६९ धावा केल्‍या हाेत्‍या.

IND vs BAN 2nd ODI :  शार्दूलला दुखापत; उमरानला संधी

जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर दुसर्‍या वन-डेसाठी अनफिट झाला आहे. पहिल्याच सामन्यात गोलंदाजी करताना शार्दूलला त्रास होत होता. त्यामुळे आता तो दुसरी वन-डे खेळले का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेनंतर कसोटी मालिकादेखील होणार आहे. अशात संघ व्यवस्थापन कोणताही धोका घेणार नाही. शार्दूलला विश्रांती देऊन जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला संधी दिली जाऊ शकते. मलिकने भारताकडून फक्त तीन वनडे सामने खेळले आहेत. या 3 सामन्यांत त्याने 3 विकेटस् घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने पदार्पण केले होते. आजच्‍या सामन्‍यात शाहबाज अहमदच्‍या  जागाी अक्षर पटेल याला संधी दिली आहे.

भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (क), इनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान.

Back to top button