पुणे : रस्ते‌ सजणार पादचाऱ्यांसाठी ; २१ रस्त्यांवर रविवारी पादचारी दिन

पुणे : रस्ते‌ सजणार पादचाऱ्यांसाठी ;  २१ रस्त्यांवर रविवारी पादचारी दिन
Published on
Updated on

हिरा सरवदे : 

पुणे : महापालिकेकडून यंदाही 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. मात्र, यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवून हा
दिन शहरातील 21 रस्त्यांवर राबविण्यात  येणार आहे.  वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचार्‍याला महत्त्व मिळवून देण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षापासून 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिलीच महापालिका आहे.

गतवर्षी केवळ लक्ष्मी रस्त्यावरच पादचारी दिन साजरा करण्यात आला होता. रंगीबेरंगी तोरणांनी सजलेला चकाचक रस्ता… कुठे गिटारवादन तर कुठे पथनाट्यातून जनजागृती करणारे कलाकार… सापसिडी अन् रंगकामात मग्न झालेले लहानगे… सनई-चौघड्याचा सुमधुर आवाज…. सेल्फी अन् छायाचित्रांसाठी लगबग… जागोजागी झाडांच्या कुंड्या… अशा बहुरंगी, उत्साही अन् आनंददायी वातावरणात पुणेकरांनी अडथळाविरहित जागातील पहिला पादचारी दिन साजरा केला.

यंदाही शहरात 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार असून, शहर आणि उपनगरांमधील 21 रस्त्यांसह हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षी पादचारी दिनाचे औचित्य साधून पाषाण-सूस रस्ता आणि औंध येथील चिल्ड्रन ट्राफिक पार्कचे उद्घाटन करण्यात आले. तशाच प्रकारे यंदा पादचारी दिनानिमित्ताने चालणे आणि सायकलिंगसाठी पुणे स्ट्रीट्स असेसमेंट आणि पुणे शालेय सुधार योजना पुस्तिकेचे लोकार्पण, तसेच पीएमसी शालेय प्रवास सुधार योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पीएमसी शालेय प्रवास सुधार योजनेंतर्गत खराडी, डेक्कन आणि पर्वती परिसरातील प्रत्येकी तीन शाळांच्या परिसरामध्ये 11 ते 16 डिसेंबर यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना चालण्यास व सायकलिंगवर जाण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शाळांमध्ये सायकल रॅली, विद्यार्थी व पालकांच्या प्रतिक्रिया नोंदविणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

या रस्त्यांवर राबविला जाणार पादचारी दिन
उंबर्‍या गणपती चौक ते गरुड गणपती चौक, लक्ष्मी रस्ता
लाल बहादूर शास्त्री रस्ता
जंगली महाराज रस्ता
पाषाण-सूस रस्ता
रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी
गजानन महाराज मठ ते पंचमी चौक, सहकारनगर रस्ता
जगताप चौक, वानवडी
महंमदवाडी चौक ते संविधान चौक रस्ता
रहेजा सर्कल ते विबग्नोर शाळा
हडपसर गाडीतळ ते गोंधळेनगर, सासवड रस्ता
मयूर कॉलनी रस्ता ते सिटी प्राईड थिएटर, कोथरूड
पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी, कर्वे रस्ता? खराडी दक्षिण मुख्य रस्ता
विश्रांतवाडी ते 509 चौक, आळंदी रस्ता
(उर्वरित रस्ते निवडण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news