पंढरपूर ते घुमान सायकलवारी 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये

सायकलवारी,www.pudhari.news
सायकलवारी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संत नामदेव जयंतीनिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) ते घुमान (पंजाब) अशी रथयात्रा व सायकलवारी काढण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. दि. 8 नोव्हेंबरला सायकलवारी नाशिकला तुपसाखरे लॉन्स येथे मुक्कामी असेल.

यात्रा शुभारंभास सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे उपस्थित राहणार आहेत. यात्रा नाशिक येथून त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठमार्गे पुढे घुमानकडे मार्गस्थ होईल, अशी माहिती नामदेव समाजोन्नती परिषदेचे महानगराध्यक्ष अतुल मानकर आणि आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वृषाली तुपसाखरे यांनी दिली.

भागवत धर्म प्रसारक संघ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव दरबार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रथयात्रा व सायकलवारी 2,300 किमीची आहे. तिचा समारोप 28 नोव्हेंबरला चंदीगड येथे राजभवनात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, असेही मानकर व तुपसाखरे यांनी सांगितले. दररोज 100 किमीचा प्रवास करीत गुजरात, राजस्थान, हरियाणामार्गे रथयात्रा व सायकलवारी 26 नोव्हेंबरला घुमान (पंजाब) येथे मुक्कामी पोहोचेल. तेथे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ज्ञानेश्वर माउली नामदास यांचे काल्याचे कीर्तन होईल. 27 नोव्हेंबरला योगी निरंजनदास यांचे संत नामदेव यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान होईल. यानंतर सायकलवारीत सहभागी झालेल्यांचा सत्कार होईल. 28 नोव्हेंबरला चंदिगड येथे राजभवनात रथयात्रा व सायकलवारीचा समारोप राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायकलवारीद्वारे शांती, समता व बंधुता याचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन,प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतील.

दि. 8 नोव्हेंबरला रथयात्रा व सायकलवारी नाशिकला येणार असल्याने समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तुपसाखरे लॉन्सवर तिचे स्वागत करण्यात येईल. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होतील. कुलवंतसिंग बग्गा, अवतारसिंग फनफेर यांच्यासह शीख बांधवही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 110 ज्येष्ठ सायकलपटू
सायकलवारीत 50 पेक्षा अधिक वयोमान असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 110 सायकलपटू सहभागी होतील. त्यात 79 वर्षीय सुरेंद्र देशपांडे, 74 वर्षीय निरुपमा भावे, 72 वर्षीय शिवाजी हंडाळ, 71 वर्षीय सुभाष कोकणे तसेच नाशिकचे महेश बडगुजर, अरविंद निकुंभ यांचाही सहभाग आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news