Drug case : एमडीतील फय्याजच्या मागावर पोलिस, परराज्यातही अमली पदार्थ पुरविल्याचा संशय

Drug case : एमडीतील फय्याजच्या मागावर पोलिस, परराज्यातही अमली पदार्थ पुरविल्याचा संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवासामनगाव येथे कारवाईत पकडलेल्या एमडी प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून फय्याज नाव समोर येत आहे. अटकेत असलेल्या संशयितांच्या माहितीनुसार, फय्याजने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही एमडी पुरवल्याचे समजते. त्यानेच सनी पगारे व अर्जुन पिवाल यांना एमडी कारखाना तयार करण्यासाठी मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शहर पोलिस फय्याजचा शोध घेत आहेत. (Drug case)

सामनगाव परिसरात एमडी पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सोलापूर येथे संशयितांनी कारखाना उभारून एमडी तयार केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी संशयित टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. संशयितांनी एमडी तयार करण्यासाठी परराज्यातूनही कच्चा माल मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या टोळीस सराईत गुन्हेगार मदत करत असल्याचा संशय पेालिसांना होता. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता, या टोळीचा मास्टरमाइंड व एमडीचे जाळे परराज्यात पसरवणारा संशयित फय्याज असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार फय्याजच्या मागावर काही पथके रवाना झाली आहेत. (Drug case)

ललितसह चौघे मध्यवर्ती कारागृहात

शिंदे गावातील एमडी गोदाम प्रकरणात अटकेत असलेल्या ड्रग्ज माफिया संशयित ललित पानपाटील याच्यासह रोहित चौधरी, हरीश पंत, जिशान शेख या संशयितांना अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी (दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मुंबईतील आर्थररोड कारागृहात करण्यात आली आहे. 10 दिवसांच्या पोलिस कोठडीत ललितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात तयार केलेले एमडी दोन संशयित राज्यात वितरीत करीत होते. त्यामुळे दोघांना शहर पोलिस लवकरच ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news