Pune Crime News : पोलिसांवर गोळीबार करणार्‍या दरोडेखोराला पकडले

Pune Crime News : पोलिसांवर गोळीबार करणार्‍या दरोडेखोराला पकडले
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह नगर व सोलापूर जिल्ह्यांत घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारर्‍या दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करून पसार झालेल्या या दरोडेखोराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हंसराज उर्फ हंसू रणजितसिंग टाक (वय 18, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्या वेळी टाक हा कॅनोल रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, सहा लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले यांनी ही कारवाई केली.

नगर, सोलापूर पोलिस मागावर

आरोपी टाक आणि साथीदारांनी सोलापूर व नगर जिल्ह्यांत दोन ठिकाणी दरोडा घातला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी टाकच्या साथीदारांना अटक केली. त्या वेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. गोळीबारानंतर हंसराज टाक पसार झाला होता. टाक हा दहा गुन्ह्यांत आरोपी असून फरार होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news