

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिटीलिंक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट वॉचमन राहत असलेल्या पत्राच्या शेडवर जाऊन धडकली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली असून अन्य चार जण थोडक्यात बचावले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक (एम एच १५ जी व्ही ८०३० ) वरील चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट वाचमन राहत असलेल्या पत्राच्या शेडमध्ये धडकली. यावेळी बस धडकल्याने आवाज झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता संबंधित बस चालक हा बस सोडून पसार झाला. यावेळी इतर बसमधील चालक या ठिकाणी धावत आले व त्यांनी बस बाहेर काढली. या धडकेत यमुना भोये यांना किरकोळ दुखापत झाली व पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्याची नासधुस झाली. घटनेची माहिती सिटीलिंक अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सिटीलिंकचे अधिकारी अजित बच्छाव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व घटनेची सविस्तर चौकशी करून कंपनीकडून संबंधित वॉचमन यांचे कुटुंबीयांना भरपाई देणार असल्याचे यावेळी सांगितले .
हेही वाचा :