नाशिक : पंचवीस लाख लोकसंख्येसाठी मनपाचे पाणी नियोजन

नाशिक : पंचवीस लाख लोकसंख्येसाठी मनपाचे पाणी नियोजन
Published on
Updated on

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांनुसार नाशिककरांना पिण्यासाठी पाणी आरक्षण मागणी नोंदविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाख ९० हजार इतकी असली तरी गेल्या १२ वर्षांतील लोकसंख्या वाढ विचारात घेता शहराची अंदाजित लोकसंख्या २२ लाख ३७ हजार तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या तीन लाख गृहीत धरून एकूण २५ लाख लोकसंख्येच्या हिशेबाने पाणी नियोजनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे.

संबधित बातम्या :

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर व मुकणे धरण तसेच काही प्रमाणात दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमधील पाणी दरवर्षी १५ आॅक्टोबर ते ३१ जुलै या दरम्यानच्या कालावधीसाठी आरक्षित केले जाते. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत त्या संदर्भातील निर्णय घेतला जातो. यंदाही पाणी आरक्षणाच्या बैठकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिकेला पत्र पाठवत शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने पाणी नियोजनाचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मराठवड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीतील जलपातळी अत्यंत कमी आहे. त्यामुळे नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडीसाठी विसर्ग करण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने निराशा केल्यास पाण्याचा प्रादेशिक वाद उद्भवण्याची भीती आहे. या सर्वाचा विचार करून राज्य शासनाने प्रत्येक शहर व जिल्ह्याच्या पाणीवापराची माहिती मागवली आहे. नाशिक महापालिकेने शहरी कार्यक्षेत्राचा विचार करून साधारण २५ लाख लोकांची तहान भागवण्याच्या दृष्टिकोनामधून पाणी नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दरडोई १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

नाशिक महापालिकेने २०१८ मध्ये केलेले वॉटर ऑडिट तसेच विविध योजनांसाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांनुसार २०२३ मधील अंदाजित लोकसंख्या २२ लाख ३७ हजार इतकी आहे. १५० दशलक्ष लिटर इतका दरडोई पाणीवापर असून, त्यानुसार पाणी आरक्षणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार शहरामध्ये 28 टक्के पाणी गळती आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news