Nashik Ganesh Visarjan | कोर्टाचे नियम धाब्यावर! नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजे-लेझरचा दणदणाट; 36 गणेश मंडळांवर गुन्हे

Nashik Ganesh Visarjan | उच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतरही डीजे, लेझरचा वापर; ३६ मंडळांवर गुन्हे दाखल
laser light
लेसर, लाईटfile photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेशविसर्जन मिरवणुकीत ध्वनी आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने यंदा कडक निर्बंध घातले. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके, अतितीव्र लेझर तसेच नियमबाह्य ध्वनिवर्धकांच्या वापरावर निर्बंध असतानाही विसर्जन मिरवणुकीत डीजे, ढोल-ताशे, फटाके आणि अन्य ध्वनिवर्धकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे दिसून आले.

laser light
Nashik Drought Scarcity | नाशिक जिल्ह्यात धरणे भरली, पण शेतकरी चिंताक्रांत! वगळलेल्या 5 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती

नाशिकमध्ये अटी-शर्तींचे उल्लंघन करून डीजेचा वापर करणाऱ्या ३६ सार्वजनिक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भद्रकाली ११, सरकारवाडा १८, तर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल केले आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठली आहे. पुण्यात यंदा ११५.४, ठाण्यात १०५ डेसिबलची नोंद झाली असून, नाशिकमध्ये देखील आवाजाच्या विक्रमी नोंदीचा अंदाज आहे.

मागील वर्षी नाशिकरोड-रामकुंड येथे गणेशोत्सवाच्या अंतिम निरीक्षणदिनी ८९.१५ डेसिबल, तर पंचवटी-अशोकस्तंभ येथे ८५.६९ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत आवाजाने मर्यादा ओलांडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिकरोड-रामकुंड, पंचवटी-अशोकस्तंभ, सिव्हिल हॉस्पिटल-गाडगे महाराज पुतळा, त्रिमूर्ती चौक-वालदेवी नदीकाठ आणि सातपूर बसस्थानक या ठिकाणी मोजमाप करण्यात आले आहे.

प्लाझ्माचा लखलखाट:

मोठ्या मंडळाने डीजे, साउंड सिस्टीमसह डोळे दिपविणाऱ्या प्लाझ्माचा प्रखर लाइटचा झगमगाट केला. वास्तविक यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले होते. मात्र, तरीदेखील काही मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केले. या मंडळांवर आता कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.

वरिष्ठ पोलिस प्रतिक्रिया:"वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटी अवगत करून दिल्या होत्या. या नियमांचे पालन करणे प्रत्येकाचेच कर्तव्य होते. मात्र, असातही काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर येत असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे."

- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

laser light
Nashik Accidental Death | नाशिक जिल्ह्यात काळाचा घाला! वेगवेगळ्या अपघातांत अन् दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

'बाप्पा'ला निरोप; पण प्रदूषणाचा ठेवा नदीतच:

गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि सामाजिक एकोपाचा उत्सव असला, तरी त्यासाठी पर्यावरणाची किंमत मोजावी लागू नये, ही अपेक्षा आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयीन आदेश, तर जलप्रदूषणाबाबत पर्यावरणीय मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीचे आव्हान कायम आहे. यंदाच्या गणेशविसर्जनानंतर 'एमपीसीबी'कडून ध्वनी आणि जलगुणवत्तेचा अधिकृत निरीक्षण अहवाल जाहीर केला जाणार असून, गतवर्षीपेक्षा अधिक प्रदूषण नोंदवले जाण्याचा अंदाज आहे.

सूचना तरीही उल्लंघन:

यंदा न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अधिक कठोर निर्देश दिले होते. परवानगी असलेल्या ध्वनियंत्रणेची डेसिबल पातळी तपासणे, ध्वनिमर्यादा ओलांडणारी यंत्रणा जप्त करणे, साउंड लिमिटरचा वापर आणि नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नाशिकमध्येही पोलिसांनी मंडळांच्या बैठका घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याने ३६ सार्वजनिक गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news