Nashik Accidental Death | नाशिक जिल्ह्यात काळाचा घाला! वेगवेगळ्या अपघातांत अन् दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Accidental Death | उमराळेजवळ दांपत्याचा अपघात
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उमराळे (ता. दिंडोरी) गावाजवळ झालेल्या अपघातात नाशिक शहरातील भिसे मळा परिसरातील वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला. हरिशंकर जाधव (७४) आणि संध्या हरी जाधव (६७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही कॉलेज रोड परिसरातील बिग बाजारजवळील भिसे मळा येथे राहत होते.

Ahilyanagar News
Land Scam SIT | 'नाशिक डायोसेशन ट्रस्ट'च्या जमीन व्यवहारांची एसआयटी चौकशी

गुरुवारी (दि. २४) जाधव दांपत्य पिकअप वाहनातून उमराळे येथून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत होते. उमराळे गावाजवळ त्यांच्या वाहनाला अचानक धडक बसून हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. मृतदेह विच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.

जाधव दांपत्याचा दूध व्यवसाय होता. त्यांची स्वतःची डेअरी असून, व्यवसायाच्या माध्यमातून ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि कुटुंब असा परिवार आहे.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच संबंधित वाहनांची माहिती याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपघाताची नोंद करून दिंडोरी पोलिस ठाण्याचे पथक तपास करीत आहे. अपघातातील परिस्थिती, वाहनांची धडक आणि अन्य बाबींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

खड्डे अपघातात दोघांचा बळी

नांदूरशिंगोटे - निमोण मार्गावरील त्रिशक्ती पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि. २५) रात्री दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. योगेश सोपान ठाकरे (२७) आणि रामदास रावसाहेब माळी (३२, दोघेही रा. पळसखेडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे आहेत. योगेश ठाकरे व रामदास माळी हे दुचाकी (एमएच १५, डीपी २७२०) वरून नांदूरशिंगोटेकडून निमोणच्या दिशेने जात होते.
रात्री ११ च्या सुमारास त्रिशक्ती पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज आहे. अपघातांतर स्थानिकांनी दोघांना उपचारासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना ते दिसत नसल्याने अपघात वाढले आहेत. याप्रकरणी बबन विलास पवार यांनी दिलेल्या बातमीवरून अपघाताची नोंद झाली आहे.

खदानीमधील पाण्यात युवक बुडाला

चुंचाळे येथील घरकुल योजनेजवळील पाण्याने भरलेल्या खदाणीत गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घरकुल योजना परिसरातील युवक संदीप खणपटे (२३) हा शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ४ च्या सुमारास गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी खदानीजवळ गेला होता, विसर्जन करताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.

खदानीच्या तळाशी मोठा प्रमाणात गाळ असल्याने त्याला पाण्याबाहेर येऊ शकला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, ग्रामीण पोलिस, तसेच बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार आणि तळातील गाळामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.

Ahilyanagar News
Nashik Ganpati Visarjan 2026: नाशिक पोलिसांचा दणका, अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढलं; एक मंडळ- एक ढोलपथकाचा नियम

डोहात पिता-पुत्राने गमावला जीव

पाण्यात पोहणाऱ्या वडिलांना पाहून मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, काही वेळातच तो पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २६) दुपारी १२.३० च्या सुमारास मिळून आला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय धोंडू सोनवणे (५८, रा. अक्षय चौक, सिडको) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ६ च्या सुमारास पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी (दि. २५) रात्री ७.३० च्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला, तर श्री याचा मृतदेह शनिवारी सापडला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस हवालदार बोराडे आणि पोलिस हवालदार तूपलोंढे अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news