नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असताना प्रशासकीय स्तरावरही लगबग सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निवडणूक शाखेने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

जिल्हा निवडणूक शाखेकडून राबविण्यात येणार्‍या मतदारयाद्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 1 जून ते 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्वपुनरीक्षण कार्यक्रम निर्धारित केला आहे. तसेच पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबरला एकत्रित प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी करणार असून, 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. नवीन मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी वोटर हेल्पलाइन अ‍ॅप, एनव्हीएसपी पोर्टलद्वारे किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नमुना 6 भरावा. तसेच मतदारयादीत नाव तपासून घ्यावे, नमुना 6 ब मध्ये मतदारयादीशी आधार संलग्न करून मतदार यादी शुद्धीकरणास सहकार्य करावे, असे आवाहनही गंगाथरन डी. यांनी केले आहे.

असा आहे पुनरीक्षण कार्यक्रम…
17 ऑक्टोबर : एकत्रीकृत प्रारूप यादी प्रसिद्धी
30 नोव्हेंबर : दावे व हरकती स्वीकारण्यासाठी मुदत
26 डिसेंबर : दावे व हरकती निकालात काढणे
1 जानेवारी : यादी अंतिम प्रकाशनासाठी परवानगी घेणे
5 जानेवारी : मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news