नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरात वंचित बालक विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये २२ डिसेंबरपर्यंत एकूण १,९९३ बालकांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणात एमआर १ चा डोस ९८४, तर एमआर २ चा डोस १,००९ बालकांना आरोग्य सेविकांमार्फत देण्यात आला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडत आहे. पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर आणि दुसरा टप्पा १५ ते २५ जानेवारी २०२३ अशा कालावधीचा आहे. विशेष मोहिमेत नाशिक शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. लशीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल, याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news