Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात दीड वर्षात 9,311 जणांना सर्पदंश, सर्वाधिक घटना कोणत्या भागात?

सर्पदंश,www.pudhari.news
सर्पदंश,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे

जिल्ह्यात दीड वर्षात नऊ हजार ३११ जणांना सर्पदंश झाला आहे. वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मालेगाव, सटाणा, पेठ, हरसूल, सुरगाणा या भागांत सर्वाधिक सर्पदंश झाल्याच्या नोंदी आहेत.

जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात असल्याने माती भुसभुशीत असते. त्यामुळे या ठिकाणी सापांचा वावरही वाढलेला असतो. त्यामुळे सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात झाल्या आहेत. पावसाळ्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडत असतात. जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार सर्पदंश झाल्यानंतर सर्वाधिक उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात घेण्यात आले आहेत. त्या खालोखाल मालेगाव, सटाणा, निफाड, चांदवड, घोटी, हरसूल, पेठ येथील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत चार हजार ९६० जणांना सर्पदंश झाला होता. तर १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत चार हजार ३५१ जणांना सापाने चावा घेतला आहे. त्यामुळे यावर्षी आठ महिन्यांतच गेल्या वर्षी झालेल्या सर्पदंशाच्या घटनांपैकी ८८ टक्के सर्पदंश झाले आहेत.

सर्पदंश टाळण्यासाठी ही घ्यावी खबरदारी

घरात तसेच घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग करू नये. घराच्या खिडक्या, दरवाजे, गॅलरीपर्यंत आलेले वृक्ष, वेली कापाव्यात. रात्री घराबाहेर पडताना सोबत टॉर्च ठेवावा. शेतात काम करताना बूट घालावेत. गवत कापताना किंवा अडगळीचे साहित्य काढताना खबरदारी घ्यावी. साप दिसल्यास सापाला मारू नये किंवा त्यास स्वत: पकडू नये. साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवावे. पावसाळ्यात शेतातून, गवतातून चालताना काळजी घ्यावी.

.. विंचूही चावला

जिल्ह्यात १ एप्रिल २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २,५५५ जणांना विंचू चावले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात एक हजार २८० जणांना विंचू चावले होते. तर चालू वर्षात आठ महिन्यांतच १ हजार २७५ जणांना विंचू चावले आहेत. त्यामुळे विंचू दंशाचेही प्रमाण वाढले आहे. नामपूर, सटाणा व पेठ येथे सर्वाधिक विंचू दंशाच्या घटना घडल्या आहेत.

एप्रिल २०२१ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान गावनिहाय सर्पदंशाच्या घटना

डांगसौंदाणे – ४९, नामपूर – १७६, सटाणा – ९७९, चांदवड – ३०७, देवळा – ११४, उमराणे – १५, दिंडोरी – २५८, वणी -३१४, घोटी – ६४१, इगतपुरी – २०५, अभोणा – २१५, कळवण – ४८२, दाभाडी – १८, झोडगे – ४८, मालेगाव – ७२४, नांदगाव – २०३, मनमाड १६४, गिरणारे – ८४, जिल्हा रुग्णालय (नाशिक शहर व ग्रामीण भाग) – १,८०८, लासलगाव – ८०, निफाड – ३४१, पेठ – ६२६, दोडी – ६४, सिन्नर – ००, बाऱ्हे – १८५, सुरगाणा – २६८, हरसूल – ५५६, त्र्यंबक – २१७, नगरसूल – ४५, येवला -113

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news