नाशिक : सोमश्वर धबधब्यात बुडाले दोन तरुण; दोन दिवसात दुसरी घटना

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा : गंगापूर गावातील सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोघांचा गोदापात्रात बुडाल्याची घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी १ च्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन विभाग आणि स्थानिकांकडून शोधकार्य सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत गंगापूर धरणातून ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर उन्हाचा तडाखा बसत असल्याने अनेकजण नदीपात्रात अंघोळीसाठी गर्दी करू लागले आहेत.  गंगापूर येथील दुधसागर धबधबा बघण्यासाठी देवळाली कॅम्प येथील चार मित्र गेले होते. चौघांपैकी आकाश पचोरी (२२) पाण्यात उतरला असता. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश बुडायला लागला त्याला वाचवण्यासाठभ महेंद्र मेहेर (२२) गेला असता तो देखील पाण्यात बुडाला. इतर दोघांनी आरडा ओरड केल्यानंतर स्थानिकांनी त्वरीत मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन विभाग दोन पथकासह घटनास्थळी आले असून गंगापूर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांचे पथक दोघांना  शोधण्याचा प्रयत्नात आहेत. यावेळी गंगापूर येथील जलतरणपटू बाळा दाव्हाड, कुणाल खताळे, समाधान लांबे, विक्रम उन्हाळे, अक्षय पाटील, राहुल पवार, दिनेश वाघेरे, शरद डंबाळे, अनिल गायकवाड, राकेश साळवे हे शोध कार्यात मदत करत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news