नारायण राणे : जून महिन्याच्या वादळात ठाकरे सरकार उन्मळून पडेल | पुढारी

नारायण राणे : जून महिन्याच्या वादळात ठाकरे सरकार उन्मळून पडेल

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : आमच्या कोकणात जून महिन्यात वादळ येत असते, त्या वादळात मोठ- मोठ्या फांद्यांची झाडे मुळासहित उन्मळून पडतात. राज्यातील सरकारही फांदी सारखे आहे. ठाकरे सरकार या झाडाचे बुड नाही, ती फांदीच आहे, तेव्हा हे सरकार येत्या जून महिन्याच्या राजकीय वादळात उन्मळून पडेल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज (दि.१९) केला. वाशिम येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राणे म्हणाले की, आमच्याकडे जून महिन्यामध्ये वादळ येते. वादळ आलं की झाडं उन्मळून पडतात, महाविकास आघाडी हे एक फांद्यांचे झाड आहे, एका फांदीवर मुख्यमंत्री आहेत. मुख्य खोडावर नाहीत. त्यामुळे हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच पडेल. महसूलमंत्री असताना ८२ एकरचा सरकारी भूखंड फक्त १२ कोटी रुपयांमध्ये विकल्याच्या आरोपावर राणे म्हणाले की, या आरोपावर माझी चौकशी लावा. एसीबीची चौकशी लावा नाहीतर कोणतीही चौकशी लावा, असे ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button