चंद्रपूर : अंगणात झोपलेला वृद्ध बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार !

चंद्रपूर : अंगणात झोपलेला वृद्ध बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार !
Published on
Updated on

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या उष्णतेमुळे अंगणात झोपलेल्या वृद्ध बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात ठार केल्याची घटना आज  (दि.१९) पहाटे  सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे घडली. माणिक बुद्धा नन्नावरे असे मृताचे नाव आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. तापमानात प्रचंड वाढ होवून उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळेस घराबाहेर अंगणात झोपत आहेत. मात्र अंगणात झोपणे नागरिकांना महागात पडत आहे.

सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे माणिक बुद्धा नन्नावरे ( वय ७०)  हे रात्री अंगणात झोपले हाेते.  बिबट्याने भक्ष्याच्या शोधात नन्नावरे यांच्‍या घरात शिरकाव केला. बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात नन्नावरेंचा मृत्‍यू झाला. सकाळी घरचे कुटुंबीय जागे झाले यावेळी त्यांना ही घटना लक्षात आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news