नाशिक : तलवारी विक्रीसाठी जाताना दोन जण ताब्यात

देवळा : वासोळ येथे तलवार विक्रीसाठी आलेल्या संशयितांना ताब्यात घेताना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी. (छाया : सोमनाथ जगताप)
देवळा : वासोळ येथे तलवार विक्रीसाठी आलेल्या संशयितांना ताब्यात घेताना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी. (छाया : सोमनाथ जगताप)

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वासोळ येथे तलवारी विक्रीसाठी जात असलेल्या दोघांना नाशिक ग्रामीणच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ६) देवळा पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे वासोळ गावातील मराठी शाळेसमोर दुचाकी (एमएच. ४१ क्यू ७५७१)वरून चालक नीलेश नथूसिंग गिरासे (२१) व त्यांच्यासबोत असलेल्या परवेज शौकत शेख (४०, दोघे रा. वासोळ, ता. देवळा) त्यांच्याजवळील लोखंडी तलवार विक्रीच्या उद्देशाने आले असता त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. हवालदार भगवान निकम यांच्या फिर्यादीवरून नीलेश गिरासे व परवेझ शेख व हत्यार पुरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news