नाशिक : वीस इलेक्ट्रिक दुचाक्या जळून खाक

वीस इलेक्ट्रिक दुचाक्या जळून खाक,www.pudhari.news
वीस इलेक्ट्रिक दुचाक्या जळून खाक,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी फाटा येथे कंटेनरमधील एका दुचाकीला अचानक आग लागून वीस इलेक्ट्रिक दुचाक्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. 9) घडली. वेळीच अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्याने काही दुचाक्यांचे नुकसान टळले. मात्र या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाथर्डी फाटा येथे जितेंद्र ऑटोमोबाइल नावाचे शोरूम आहे. या ठिकाणी शनिवारी (दि. 9) दुपारी इलेक्ट्रिक दुचाक्या्ंचा कंटेनर लोड करीत असताना कंटेनरमधील दुचाकीने पेट घेतला. काही क्षणात इतर गाड्याही पेटू लागल्या. या आगीने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाचे दोन बंब या ठिकाणी दाखल झाले. आग कशामुळे लागली, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, सिडको तसेच अंबड एमआयडीसी येथील बंबांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news