दोघांनी बेट विकत घेऊन बनवला देश!

दोघांनी बेट विकत घेऊन बनवला देश!

न्यूयॉर्क : हल्‍ली अख्खे बेट खरेदी करणारे अनेक अब्जाधीश आहेत. काहीजण तर असे असतात की ते बेट खरेदी करून त्याला एक स्वतंत्र देशही घोषित करून टाकतात. अर्थात त्याला जगाची मान्यता असते की नाही हा वेगळा विषय आहे. मात्र, अशा 'मायक्रोनेशन्स'चे हल्‍ली पेवच फुटले आहे. काही वर्षांपूर्वीच दोन माणसांनी असेच एक बेट खरेदी केले व त्याला देश बनवले!

गॅरेथ जॉन्सन आणि मार्शल मेयर अशी त्यांची नावं. या दोघांनी 2019 मध्ये 'कॉफी के' नावाचे बेट विकत घेतले. कॅरेबियन देश बेलीझजवळ असलेले हे बेट 1.2 एकरमध्ये पसरलेले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी हे बेट स्वतःच्या पैशाने नव्हे तर 'क्राऊड फंडिंग' म्हणजेच लोकांकडून देणग्या गोळा करून खरेदी केले. या दोघांनी 2018 मध्ये हे बेट विकत घेण्याचे ठरवले होते; पण त्यांच्याकडे तितका पैसा नव्हता. त्यानंतर दोघांनी 'लेटस् बाय अ‍ॅन आयलंड' नावाचा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून लोकांनी त्यांना देणग्या देण्यास सुरुवात केली. त्यामधून दोघांनी सुमारे अडीच लाख पौंड म्हणजेच अडीच कोटी रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी हे बेट विकत घेतले. या बेटाचा आकार कॉफीच्या बिजासारखा असल्याने त्याला 'कॉफी के' असे नाव देण्यात आले आहे. गॅरेथ आणि मार्शल यांनी तिथे लोकांना जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या बेटाला देश म्हणून विकसित करण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे या देशाचे नाव 'प्रिन्सिपॅलिटी ऑफ आयलँडिया' असे ठेवले. या देशाचे आता स्वतःचे सरकार, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतही आहे. सध्या तेथील लोकसंख्या 249 आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news