

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कुरापत काढून एका कुटुंबाने ४३ गुंठे जागेतील गव्हाचे पीक पेटवून दिल्याची घटना नाणेगाव येथे घडली. याप्रकरणी फशाबाई अशोक रोकडे (५५, रा. नाणेगाव) यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात जाळपोळ, मारहाणीची फिर्यादीची फिर्याद दाखल केली आहे.
फशाबाई रोकडे यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी बुधवारी (दि. १) सायंकाळी मौजे नाणेगाव येथील गट नं. ४२७/१ मधील ४३ गुंठे क्षेत्रावरील गव्हाच्या पिकाला आग लावली होती. संशयित संदीप पोपट रोकडे, विक्रम पोपट रोकडे, विजय पोपट रोकडे, पोपट बाबूराव रोकडे व वनिता संदीप रोकडे (सर्व रा. नाणेगाव) यांनी कुरापत काढून बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातील गव्हाच्या पिकाला आग लावली. यात निम्म्या क्षेत्रातील गव्हाचे पीक जळून खाक झाल्याने नुकसान झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.