

कोपरगाव : येथील वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह घराच्या छतावर विच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे खून दरोड्याच्या प्रयत्नातून झाले की पूर्व वैमनस्यातून यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
दत्तात्रय गंगाधर भुजाडे, राधाबाई दत्तात्रय भुजाडे अशी दोघा मृतांची नावे आहेत. दत्तात्रय-राधाबाई हे दाम्पत्य तळेगावमळे येथे एकटेच राहतात. त्यांना दोन मुले असून ते नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. दोघे बेपत्ता झाल्याचे समजात पोलीस गावात पोहचले. त्यानंतर दोघांचे मृतदेह छतावर आढळून आले.