नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार

जुने नाशिक : येथील चौक मंडई भागात इफ्तार बाजारात विविध प्रकारचे नान खरेदी करताना मुस्लीम बांधव व महिला. (छाया: कादिर पठाण)
जुने नाशिक : येथील चौक मंडई भागात इफ्तार बाजारात विविध प्रकारचे नान खरेदी करताना मुस्लीम बांधव व महिला. (छाया: कादिर पठाण)

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रमजान पर्व सुरू आहे. या महिन्यातील तीन अशरे (टप्पे) पैकी दोन अशरे बुधवारी (दि.12) पूर्ण होऊन तिसरा व शेवटचा अशरा सुरू होणार आहे. पहिला टप्पा अशर-ए-रहमत, दुसरा अशर-ए-मगफिरत आणि तिसरा व शेवटचा अशर-ए-निजात असे तीन अशरे असतात. दरम्यान, इफ्तार बाजारांची रौनक कायम असून, अवकाळी पाऊस सुरू असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे.

24 मार्चपासून सुरू झालेल्या रमजान महिन्याचे बुधवारी 20 रोजे पूर्ण होत आहेत. 21 एप्रिल रोजी चंद्रदर्शन घडल्यास 22 ला ईद साजरी होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. इफ्तार बाजारापाठोपाठ ईदच्या खरेदीसाठीही गर्दी होताना दिसत आहे. दिवसा उन्हामुळे ग्राहक कमी प्रमाणात दिसतात तरी संध्याकाळी इफ्तार आटोपल्यानंतर बाजार भरलेले दिसत आहेत. यामध्ये महिला व मुलांची संख्या जास्त असते. दरम्यान मागील काही दिवसांपासून इफ्तारच्या वेळी अवकाळी पावसामुळे खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अस्थायी बाजारात छोट्या प्रमाणावर खाद्यपदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांचीही धावपळ होत आहे.

गोड नान, साधा नान, मसाला नान, खजूर नान, मावा नान अशा अनेक प्रकारचे नान रमजान महिन्यात बनविले जातात. या महिन्यात सेहरीकरिता मुस्लीम बांधव नानचा वापर अधिक प्रमाणावर करतात. सोबत कोरमा, दालचा, अंगारा आदी ग्रेव्ही डिशेससाठी लागणारे नान यांचीही मागणी असते. – वसीम पठाण, बेकरी मालक.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news