मुंबई : ओव्हरहेड वायर तुटली; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका | पुढारी

मुंबई : ओव्हरहेड वायर तुटली; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा दहिसर ते बोरिवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गांवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे जाणारी वाहतूक ऐन पीक अवरमध्ये विस्कळीत झाली. याचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बसला.

आज (बुधवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दहिसर ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलला होणारा विदयुत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे लोकल जागीच खोळंबल्या. या घटनेमुळे तीन लोकल रखडल्या, तरी चर्चगेटकडे जाणारी अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गांवरून वळविण्यात आली. त्यामुळे अप धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. याचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बसला.

हेही वाचा : 

Back to top button