पुणे : दिव्यांग मुलांचे विविध कलांमध्ये प्रावीण्य

पुणे : दिव्यांग मुलांचे विविध कलांमध्ये प्रावीण्य
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिव्यांग असलेल्या शिवानी हिने नुकतेच बॉलिवूड डान्स प्रकारात, तर अमितने तबलावादनात प्रावीण्य मिळविले आहे. दोघेही करिअर म्हणून कलाक्षेत्राकडे पाहू लागले असून, ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करीत आहेत. सध्याच्या घडीला दिव्यांग मुलेही विविध कला शिकत असून, त्यात अनेकांनी प्रावीण्यही मिळविले आहे. त्यांना रसिकांचाही पाठिंबा मिळत आहे.
नृत्य, वादन, गायन, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे, अभिनय, हस्तकला, चित्रकला, पाककला अशा विविध कलांचे शिक्षण 10 वर्षांपुढील दिव्यांग मुले घेत असून, मुलांच्या कला शिक्षणावर पालकही भर देत आहेत.

त्यामुळे विविध संस्थांकडून खास करून दिव्यांग मुलांना कलेचे शिक्षण दिले जात आहे. शारीरिक मर्यादेच्या पलिकडे जाऊन कला शिक्षणात मुलांनी आपले करिअर शोधले असून, त्यांना एक नवा अवकाश, आत्मविश्वास मिळाला आहे. शहरात विविध संस्था ऑनलाइन-ऑफलाइन वर्ग घेत आहेत. काही कलाकारांकडून मुलांना कलेचे शिक्षण दिले जात आहे. आता मुले विविध महोत्सव, स्पर्धा, कार्यक्रमांमध्येही सहभाग घेत आहेत. बालकल्याण संस्था पुणेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे म्हणाल्या की, मुलांचे पालक मुलांच्या कला शिक्षणाकडे विशेष लक्ष देत असून, करिअर म्हणूनही अनेकांनी गायनापासून ते वादनाचे क्षेत्र निवडले आहे.

आमच्या संस्थेत सुमारे 40 मुले कलेचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी संगीतापासून ते नृत्यापर्यंत सर्वच कलेत प्रावीण्य मिळविले आहे. हस्तकला, चित्रकला, वादन, गायन, नृत्य, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे, अशा विविध कलांचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येते. मुले मोठ्या आत्मविश्वासाने कलेचे धडे गिरवत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news