नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी

नाशिकरोड: नानेगाव बससेवा सुरु करण्याबाबतचे निवेदन वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड: नानेगाव बससेवा सुरु करण्याबाबतचे निवेदन वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी. (छाया: उमेश देशमुख)

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

परिवहन महामंडळाच्या नासिक डेपोची नाशिक रोड ते नानेगाव शहर बस कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती ती बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना देण्यात आले.

गेल्या दोन वर्षापासून परिवहन महामंडळाची बससेवा नानेगाव पर्यंत कोरोनाचे कारण पुढे करत बंद झाली होती. त्यामुळे शाळा,  महाविद्यालयाचे विद्यार्थी, शेतकरीवर्ग व प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत बससेवा सुरू नसल्याने प्रवासी वर्गाला अक्षरशः पायपीट करावी लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चेहडी, पळसे, बंगाली बाबा, पंकजनगर, पारले कंपनी, नाशिक साखर कारखाना व नानेगाव आदी गांवाना तातडीने बससेवा सुरू झाल्यास सोईचे होणार आहे. शिवाय दळणवळणासाठी ग्रामस्थांची पायपाटी थांबणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाशिक डेपोने नानेगाव बससेवा सुरू करावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, भास्कर गायधनी, गणपत गायधनी, मोतीराम तिदमे, अनिल गायधनी आदींसह पदाधिकारी वर्गाने निवेदन देऊन  मागणी केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news