सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलनाक्यावर 17 लाखांची दारू जप्त | पुढारी

सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलनाक्यावर 17 लाखांची दारू जप्त

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने मंगळवारी सकाळी ओसरगाव टोलनाक्यावर कंटेनरमधून मेडिकल मालाच्या नावाखाली छुप्या पद्धतीने वाहतूक होत असलेली गोवा बनावटीची 16 लाख 80 हजार रु. किमतीची दारू आणि 10 लाखांचा कंटेनर असा मिळून 26 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या गोवा बनावट दारूची वाहतूक होते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला आहे. मंगळवारी सकाळी वाहन तपासणी दरम्यान ही बेकायदा दारू जप्त करण्यात आली. टेम्पोमध्ये मेडिकलचा माल असल्याचे भासवण्यासाठी मेडिकलची बीले दाखवण्यात आली. मात्र ,प्रत्यक्षात गाडीत दारू होती. याप्रकरणी संशयित राम लक्ष्मण सिंह (रा. राजस्थान) याला कारवाई दरम्यान ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. एच.बी.तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवलीचे निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, जे.एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सूरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवसेकर, जगन वव्हाण यांनी ही कारवाई केली. मदतनीस म्हणून श्री. खान व श्री. शहा यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा तपास निरीक्षक प्रभात सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

Back to top button