नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे वर्धापनदिनानिमित्त आज विविध उपक्रम
Published on
Updated on

नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे महानगरात वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सोमवारी (दि.19) ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मिठाईवाटप, विद्यार्थी गुणगौरवसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली

कुमावतनगर येथे महाआरती आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मदर तेरेसा आश्रमात फळवाटप, मविप्र हायस्कूल (म्हसरूळ) येथे शालेय साहित्य वाटप, रामकुंडावर गंगाआरती, लाटेनगर येथे महाआरती, विहीतगाव येथे लाडूवाटप, शिवसेना शाखेचे पुजन व मिठाईवाटप केले जाणार आहे. तसेच देवळाली गावातील मनपा शाळेत दप्तर वाटप, बिटको चौकात लाडू वाटप, डाववखरवाडीत वृक्षारोपण व लाडु वाटप, जेलरोडला वृक्षारोपण,बिटको हाॅस्पिटल येथे फळ वाटप, सिन्नर फाटा येथे वृक्षारोपण, पाथर्डी फाटा येथे गुणगौरव सोहळा व धान्यवाटप, चार्वाक चौक येथे लाडुवाटप, अंबड पोलीस ठाणे, राणेनगर व जाधव संकुल येथे वृक्षारोपण, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय (सातपूर) येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप, मायको हाॅस्पिटल (सातपुर) ब्लॅकेट वाटप, आनंदवल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्रगती शाळा (सातपूर) येथे शालेय साहित्याचे वाटप, य दत्तधाम येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, इंदिरानगर येथे वृक्षारोपण, झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी शिबिर आदी उपक्रमांचा त्यात समावेश आहे, असेही बडगुजर यांनी पुढे नमूद केले.

या सर्व कार्यक्रमांत उपनेत बबनराव घोलप, सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, मा.आ. योगेश घोलप, माजी गटनेते विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, राहुल दराडे, सचिन बांडे, देवा जाधव, नितीन चिडे, सहभागी होणार आहेत. सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी विशाल कुमावत, संतोष पेलमहाले, सुनील जाधव, तुषार पाटील, शैलेश सूर्यवंशी, सुनील निरगुडे, महेंद्र बडवे, हर्षद पटेल, नितीन जाधव, उत्तम कोठुळे, योगेश गाडेकर आदी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news