पुणे : वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या

पुणे : वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या

वारजे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  वारजे रामनगर कॅनाॅल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकूण 7 वाहनांवर लोखंडी कोयत्याने प्रहार करून काचा फोडून वाहनांचे नुकसान केल्याची घटना वारजेतील रामनगर कॅनाॅल रस्त्यावर सोमवारी (दि. 19 जुन ) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हा या दुचाकी वरून गेलेल्या अज्ञात 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांतून वर्तविली आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल होत. माहीती घेण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये दोन आॅटो रिक्षा, एक महिंद्रा झायलो, एक इको कार, तसेच एका सफारी कार व दोन दुचाकींचा समावेश आहे. 2017 नंतर रामनगर परीसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु दोन दिवसांपूर्वीच याच रामनगर परीसरात गोळीबार घडल्याची घटना ताजी असतानाच टवाळखोरांनी पुन्हा तोंड वर काढुन आज सामान्य नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करीत रामनगर परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news