नाशिक : किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची सेनेची मागणी

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
Published on
Updated on

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवरील म्युझियमसाठी 2013 मध्ये किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला निधी राजभवनाकडे जमा केला नाही. त्या निधीचा परस्पर गैरव्यवहार झाला असून, सोमय्या यांनी हा निधी आपल्या बांधकाम व्यवसायासाठी किंवा निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा आरोप सेनेने केला आहे.

या प्रकाराची चौकशी करून किरीट सोमय्या यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चांदवड तालुका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तसे निवेदन पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या प्रतिनिधीकडे देण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरात घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक अर्चना पूरकर, तालुका संघटक रोशनी कुंभार्डे, तालुका संघटक केशव ठाकरे, शहरप्रमुख संदीप उगले, उपतालुकाप्रमुख दत्तू शेळके, गणप्रमुख साहेबराव चव्हाण, घमाजी सोनवणे, मनोज जाधव, प्रमोद उशीर, नवनाथ भवर, गोरक्ष शिंदे, सोमनाथ गोसावी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news