नाशिक: बकरी ईद, आषाढीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात आढावा बैठक

मालेगाव : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रशासक भालचंद्र गोसावी.
मालेगाव : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रशासक भालचंद्र गोसावी.
Published on
Updated on

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी (दि.29) येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिका मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.14) दुपारी आढावा बैठक पार पडली. त्यात स्वच्छतेसह तात्पुरते कत्तलखाने उभारणी व सांडवा पुलाजवळील नाला प्रवाही ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. कचरा वाहतुकीसाठी वॉटर ग्रेस कंपनीकडून सुस्थितीतील 50 वाहने सज्ज ठेवण्यासही सांगण्यात आले.

प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी शहर, आयशानगर, किल्ला, रमजानपुरा, पवारवाडी पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बांधकाम, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहन, विद्युत, आरोग्य, अतिक्रमण विभागांच्या नियोजनाची माहिती घेण्यात आली. सुनियोजित कामांमध्ये काही अडचणी जाणवल्यास वरिष्ठ आणि पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून उपायोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

विभागनिहाय जबाबदारी निश्चित
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या कत्तलखान्यांची व्यवस्था करावी, सरदार चौकातील गटारीत जल व मलनि:स्सारणचा प्रवाह सुरळीत राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. प्रमुख मार्गांची डागडुजी करावी. शहरातील ईदगाह मैदानांची साफसफाई करावी. बकरी ईद साजरी झाल्यानंतर निर्माण होणार्‍या कचर्‍याची कचरा डेपोवर तत्काळ विल्हेवाट लावावी. वाहन विभागाने ट्रॅक्टर, डंपर, सक्शन पंप, पोकलेनसह इतर वाहनांची दुरुस्ती करून घ्यावी, कचरा वाहतुकीसाठी वॉटर ग्रेस कंपनीकडून 50 सुस्थितीतील वाहने सज्ज ठेवावीत, कत्तलखान्यांमधील कचर्‍याची झाकूनच वाहतूक करावी. सण कालावधीत पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पथदीप सुरळीत ठेवावेत. वाडिया व अली अकबर रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी हारुण अन्सारी हॉस्पिटल व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक तो औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवावा. नियमितपणे फवारणी करावी, अशी कामे विभागून देण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news