पुढारी ऑनलाईन डेस्क : आदिपुरुष (Film Adipurush) २०२३ चा सर्वात मोठा चित्रपट आहे. १६ जूनला देशभरातील चित्रपटगृहात दाखल होण्यास पूर्णपणे सज्ज आहे. ओम राऊतद्वारा दिग्दर्शित चित्रपटात प्रभास-कृती सेनॉन अनुक्रमे राम-सीतेच्या प्रमुख भूमिकेत आहे. सैफ अली खानची या चित्रपटात रावण आणि सनी सिंह लक्ष्मण यांच्या भूमिकेत असेल. मराठी अभिनेता देवदत्त नागे हनुमान यांच्या भूमिकेत आहे. अनेक लोकांनी व्हीएफएक्सवरून टीका केली. पण आता या चित्रपटाची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग होत आहे. (Film Adipurush)
ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत १ लाखाहून अधिक तिकिटांची देशभरात विक्री आणि निर्मात्यांना जबरदस्त फायदा होत आहे. रिलीजच्या आधी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ॲडव्हान्स बुकिंग सुरु केलीय. काहीच दिवसात आदिपुरुषचे १ लाख तिकिट चित्रपटगृहद्वारे विक्री झालेली आहेत. यादरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाचे किती कलेक्शन होईल, याविषयी सांगण्यात आले आहे. ४ हजारहून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
ट्रेड ॲनालिस्ट सुमित कडेलने ट्विटरवर आदिपुरुषच्य एका दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आपली भविष्यवाणी शेअर केली आहे. प्रभास-स्टारर वर्ल्डवाईड ग्रॉस १२०-१४० कोटी रुपये कलेक्ट करेल. सर्व भाषांमध्ये नेट कलेक्शन सर्व भाषांमध्ये ८० कोटी रुपये ते १०० कोटी रुपये असेल.
सुमितच्या माहितीनुसार, आदिपुरुष हिंदी व्हर्जन ३० कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल. तेलुगुसहित अन्य व्हर्जनच्या आधी ६० कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन करेल. असं वाटतं की, आदिपुरुष ऐतिहासिक सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.