पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतण्याचा जागीच मृत्यू | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता - पुतण्याचा जागीच मृत्यू

पाटस (पुणे )  : पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) येथील भागवतवाडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली व मालवाहतूक करणारा ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १५) पहाटे २ वाजेच्या सुमारास पाटस भागवतवाडी याठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचालक बिभीषण बालाजी हाके (वय ३२) तर वैभव सुधाकर हाके (वय १८, रा. घोटाळा बंडगरवाडी, ता. बसवकल्याण, रा. कर्नाटक) असे मृत्यूमुखी  पडलेल्या चुलता- पुतण्याची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्ता पार करत असताना पुणे दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने  (केए-३९/९४५५)  ट्रॅक्टरच्या ट्रेलरला धडक बसल्याने ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रक चालक असणाऱ्या बिभीषण हाके व त्याच्या सोबत असणारा त्याचा पुतण्या वैभव हाके याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस शिपाई समीर भालेराव, संदीप कदम, हनुमंत भगत घटनास्थळी हजर झाले. दोन तासानंतर पुणे सोलापूर महामार्ग खुला करून देत मृतदेह बाहेर काढले.

हे ही वाचा : 

मुंबई : धावत्या लोकलमध्ये वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार

धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर

 

Back to top button