नाशिक : राज्यपालांचे पोस्टर घंटागाडीत टाकून निषेध

राज्यपालांचा निषेध,www.pudhari.news
राज्यपालांचा निषेध,www.pudhari.news

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संभाजी नगर येथे एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य पुतळा येथे दुग्ध अभिषेक करीत निषेध करण्यात आला. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा फोटो असलेले पोस्टर घंटागाडीत टाकून अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवजन्मोत्सव समिती, राष्ट्रवादी, काॅग्रेस, शिवसेना, भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यापारी बॅकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, शिवसेनेचे माजी जिल्हा दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, संभाजी मोरुस्कर, सुर्यकांत लवटे, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, किशोर जाचक, बंटी भागवत, राजेश फोकणे, विक्रम कोठूळे, शिवाजी हांडोरे, राहुल ताजनपुरे, नितीन चिडे, किरण डहाळे, विकास गिते, योगेश भोर, नितीन खर्जुल, शांताराम घंटे, गोरख खर्जुल, दर्शन सोनवणे, साहेबराव शिंदे, विक्रांत खोरात, शिवा गाडे, राहुल बोरोड, अतुल धोंगडे, योगेश देशमुख, उत्तमराव कोठूळे, युवराज मुठाळ, मंगेश पगार, अमोल पगार, अमर जमधडे, मनोज ठाकरे आदि उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news