नाशिक : गोदाघाटावर मनपाची साफसफाई मोहीम; ‘अशोका’च्या 50 स्वयंसेवकांचाही सहभाग 

पंचवटी : रामकुंड येथे स्वच्छता मोहिम राबवितांना अशोकाचे स्वयंसेवक व मनपा कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : रामकुंड येथे स्वच्छता मोहिम राबवितांना अशोकाचे स्वयंसेवक व मनपा कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या शासनाच्या उपक्रमानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त नाशिक महापालिका व अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडिज अ‍ॅण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने रामकुंड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

नाशिक महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडिज अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालयाचे 50 स्वयंसेवकांच्या मदतीने गंगाघाट व रामकुंड परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशाने व विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यात विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 23 कर्मचारी, अशोका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष रुकारी, डॉ. आशा ठोके, संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे सहभागी झाले होते. यासाठी अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या राष्ट्रीय सेवा योजनाप्रमुख प्रा. प्रिया कापडणे, प्रा. नरेश सावंत, राष्ट्रीय सेवा योजनाप्रमुख प्रा. मोनाली सारंगधर, डॉ. मोनाली काकडे यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news